जागतिक लोकसंख्या

जागतिक लोकसंख्या म्हणजेच एकूण मानवी लोकसंख्या होय. इ.स. २०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 8,112 अब्ज झाली आहे.भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसं़या असलेला जिल्हा आहे.देशाच्या इतर राज्यांमधून नोकरी, दैनंदिन रोजीरोटी, शैक्षणिक संधी आदी कारणांसाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरण झाले आहे. 1991-2001 मध्ये दक्षिणेतील चारही राज्यातून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. प्रमाण वाढले आहे ते उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून येणाऱ्यांचे. 1991-2001 दशकात मुंबईची नैसर्गिक वाढ होती 61 टक्के. स्थलांतरणामुळे 43.7 टक्के. “लोकसंख्या ही मुंबईची नेहमीच दंडदेवता ठरली आहे. पण मुंबई म्हणजे काही केवळ आकडे नव्हे. संख्याशास्त्राचा संच नव्हे पण मुंबई म्हणजे शहरातील लोक, जनसामान्य.” असे म्हणले जाते. जन्मप्रमाण, मृत्यूप्रमाण, स्थलांतरण वाढीनुसार लोकसंख्या, स्त्री-पुरुष संख्येतील चढउतार होत असतात. मुंबई ही भारताची व्यापारी राजधानी व औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. हे सर्वमान्य आहे. बाहेरच्या राज्यातून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद हय़ा चार शहरातही मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत आहे. आधुनिकीकरण, उद्योगीकरण, शहरीकरण हय़ा तीन प्रमुख कारणांमुळे स्थलांतरण होत आहे. त्यामुळे शहरामध्ये जसा वाढत्या लोकसंख्येची समस्या निर्माण झाली आहे. त्याबरोबरच शहरामध्ये झोपडपट्टय़ामध्येही प्रचंड वाढ होत आहे, कारण शहरांमध्ये नोकरी, रोजगारी मिळेल पण बऱ्यांपैकी निवारा, आसरा, घर मिळणे ही विशेष कठीण बाब ठरली आहे. त्यामुळे झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेतला जात आहे. विश्वलोकसंख्येत पहिले 10 मोठय़ा लोकसंख्येचे देश आहेत चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, रशिया आणि जपान. आणि देशातील राज्ये आहेत. टक्केवारीत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू (तिन्ही राज्यातील टक्केवारी प्रत्येकी 6 टक्के) गुजरात, ओरिसा, झारखंड व केरळ (चारही राज्ये प्रत्येकी 3 टक्के) छत्तीसगड, पंजाब, हरियाणा (प्रत्येकी लोकसंख्या 2 टक्के) उत्तराखंड व दिल्ली (प्रत्येकी 1 टक्के, इतर राज्यांची 2 टक्के). देशातील मोठय़ा लोकसंख्येच्या राज्यात लोकसंख्यावाढीत घट होणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ व्हायला हवी हाच यंदाच्या विश्वलोकसंख्या दिनाचा संदेश आहे. 8 अब्ज लोकसंख्या 15 नोव्हेंबर 2022 रोजी झाली.

Comments